गडचिरोली : कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक पद कंत्राटी पध्दतीने भरती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा सैनिक कल्याण कक्ष,गडचिरोली करीता सैनिक प्रर्वगामधुन अशासकीय,निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन रुपये 13,323/- कंत्राटी पध्दतीने कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक 2 पदे (175 दिवसा करीता फक्त) भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छूक माजी/आजी माजी सैनिक पत्नी /विधवा पत्नी यांनी या कार्यालयात 07 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 12.30 वाजता सैन्य सेवेतील संपुर्ण मुळ आणि छायांकित कागदपत्रासह मुलाखती करीता हजर रहावे.(अशासकीय कल्याण संघटक या पदा करीता सैन्यातील नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा वरील हुद्यांवर काम केलेल्या संवर्गातून तसेच अशासकीय लिपीक टंकलेखक या पदाकरीता इंग्रजी टंकलेखन 40 व मराठी टंकलेखन 30 प्रमाणपत्र तसेच संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.) असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.
News - Rojgar