माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विशेष उपस्थितीत आलापल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
- भीमसैनिकांच्या आग्रहाने डिजेचा तालावर राजेंनी धरला ठेका, लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्य आलापल्ली येथे भव्य अभिवादन तथा रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता, गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सदर कार्यक्रम तथा रैलीत उपस्थित राहून तथागत गौतम बुद्ध तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानवास जयंतीदिनी अभिवादन केले.
यावेळी टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे दूध वाटप करण्यात आले असता राजेंनी या ठिकाणीसुद्धा भेट दिले. उपस्थित सर्वांशी राजेंनी आस्थेने संवाद साधला, भिमसैनिकांच्या विशेष आग्रहास्तव राजेंनी डिजेचा तालावर ठेका धरून त्यांचा उत्साह वाढवला. आणि समस्त भिमसैनिकांना राजेंनी भिमजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिले.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur