परिस्थितीनुरूप पाणी वाटपाचे नियोजन करा : जिल्हाधिकारी विपिन इटनकर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : आगामी काळातील संभाव्य पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन परिस्थितीनुरूप पाणी वाटपाचे नियोजन करा. जेणेकरून पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी आयोजित बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय पाणी वाटप समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर आणि पाटबंधारे विभागाचे (दक्षिण) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यात तोतलाडोह, नवेगाव खैरी, खिंडसी, वडगाव व नांदे असे एकूण पाच मोठे प्रकल्प आहेत. तर १२ मध्यम प्रकल्प आहेत. तर ६० लघू प्रकल्प आहेत. जिल्ह्यात एकूण ७७ प्रकल्प आहेत. प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. या प्रकल्पातील पाण्याचे पुढील परिस्थितीचा अंदाज घेऊन नियोजन करा. जेणेकरून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही. औद्योगिक, शेती व पिण्याच्या पाणी वाटपाचे सुयोग्य नियोजन करा. असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
नागपूर पाटबंधारे विभागातर्फे यावेळी जिल्ह्यातील प्रकल्पांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा साठा असल्याचे त्यांनी यावेळी सादरीकरणादरम्यान सांगितले.
News - Nagpur