महत्वाच्या बातम्या

 कायाकल्प कार्यक्रमाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठीची कार्यशाळा संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आरोग्य संस्थांमध्ये चांगल्या सेवा पुरवून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व विविध आरोग्य विषय बाबींचा अहवाल अद्यावत ठेवून आरोग्य दर्जा सुधारण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशिक्षण पथक येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर यांच्या अध्यक्षतेखाली कायाकल्प व एन.क्यू.ए.एस. कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण वेदपाठक, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. लक्षदिप पारेकर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदिप नखाते, साथरोग शास्त्रज्ञ डॉ. विनीत झलके आदी उपस्थित होते.
कायाकल्प कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सन २०२२-२३ करीता एकूण ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र, १४० आरोग्यवर्धिनी केंद्र, १ जिल्हा सामान्य रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय व ८ ग्रामीण रुग्णालयांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे. तर एन.क्यू.ए.एस. कार्यक्रमामध्ये ७ प्राथमिक आरोग्य केंद्र, १४ आरोग्य वर्धिनी केंद्र, १ जिल्हा सामान्य रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय व १ ग्रामीण रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.
कायाकल्प कार्याक्रमाचा मुळ उद्देश आरोग्य संस्थेमधील स्वच्छतेविषयक बाबी, कचरा व्यवस्थापन व विविध आरोग्य बाबीचा अहवाल अद्यावत ठेवण्यासबंधित आहे. यासाठी कार्यशाळेचे आयोजन करुन अधिक उत्कृष्ट काम करण्याकरीता प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी कायाकल्प कार्यक्रमांतर्गत सन २०१७ -१८ व २०१८ -१९ या वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या साहूर प्राथमिक आरोग्य केंद्र व सन २०१९ - २० मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र अल्लीपूरचा मान्यवरांच्या हस्ते कायाकल्प पुरस्कार व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यशाळेस सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos