महत्वाच्या बातम्या

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना अंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना सण- २०२२-२३ अंतर्गत जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा मंजूर झाला आहे. या योजनेत सुटी फुले, पॅक हाऊस, हळद लागवड, मिरची लागवड, प्लास्टिक मल्चिंग, ड्रॅगन फ्रुट लागवड, हरितगृह व शेडनेट हाऊस उभारणी, सामुहिक शेततळे व ट्रॅक्टर करीत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे. प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज सादर करावे. अधिक माहिती करीत तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अर्जना कडू यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos