राजीव जल उपसा सिंचन भेंडाळा योजनेला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्या : आमदार देवराव होळी यांना शेतकऱ्यांचे निवेदन


- सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाही शेतकऱ्यांनी दिले होते मागणी पत्र
- योजना मंजूर करून निधी उपलब्ध करून देणारच आमदार देवराव होळी यांची निवेदकांना हमी
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राजीव उपसा जलसिंचन योजना भेंडाळा मागील अनेक दिवसांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असून चिंचडोह बॅरेजच्या पाण्याच्या उपस्यावर सदर योजना कार्यान्वित करून हजारो शेतकरी परिवारांना त्याचा लाभ मिळावा याकरिता भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेला मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार देवराव होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
सदर योजना मंजूर व्हावी याकरिता आपण शासन स्तरावर अनेक पत्रव्यवहार केले असून विधिमंडळाच्या माध्यमातून प्रश्नही उचललेले आहे. मंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेवरून व बैठकांमधून सदर योजना मंजुरी मिळण्याच्या मार्गावर असून आपण ही योजना मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी हमी आमदार देवराव होळी यांनी निवेदकांना दिली आहे.
यावेळी उपस्थित संजय चलाख, निखिल उंडीरवाड़े, विट्ठल सातपूते, गुरुदेव डांगे, गजानन वैरागडे, देवराव खांडेकर, राजू पोरेड्डीवार, मनोहर नदगिरवार, रेवनाथ तुम्बले, दिलीप कुंघाडकर, यांच्या सह भेंडाळा परिसरातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




