महत्वाच्या बातम्या

 उद्योग निरीक्षक या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ अस्थायी नियुक्ती द्या : आ. किशोर जोरगेवार


- मुख्यमंत्री यांना मागणी, तात्काळ बैठक लावण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : उद्योग निरीक्षक या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ अस्थायी नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेत केली आहे. या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असुन सदर मागणी संदर्भात तात्काळ बैठक लावण्याचे निर्देश संबधित विभागाला दिले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल २८ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर झाला आहे. यात १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उद्योग निरीक्षक गट-क या पदावर निवड झाली आहे. मात्र या उमेदवारांना अजून पर्यंत नियुक्ती आदेश प्राप्त झालेले नाही. नियुक्ती प्राधिकरण उद्योग संचालनालयात उमेदवार सतत संपर्क साधत नियुक्ती आदेश लवकर देण्यासंदर्भात मागणी करत आहे. मात्र कागदपत्रे पुनःतपासणी चालू आहे. असे कारण संबधित अधिकार्याकडून वांरवार सांगितले जात आहे.      

परिणामी नियुक्ती आदेश देण्यास विलंब होत आहे. स्पर्धा परीक्षेची दिवसरात्र तयारी करून परीक्षेमधून अंतिम यादीत निवड झाल्यानंतर ही त्यांना नियुक्तीचे आदेश प्राप्त होत नसल्याने उमेदवारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्योग निरीक्षक या पदावर निवड झालेल्या उमेदवारांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून अन्य गट-क पदावर निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणाऱ्या अस्थायी नियुक्ती प्रमाणेच सदर पात्र उमेदवारांना अस्थायी नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेत केली आहे. याची दखल घेत याबाबत तात्काळ बैठक लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित विभागाला दिले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos