महत्वाच्या बातम्या

 नागपूर विभाग पदवीधर निवडणूक भंडारा जिल्हयात शांततेत मतदान : मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेली पूर्वतयारी आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे मतदान प्रक्रिया सुरळीत चालू आहे.

मतदानाच्या दिवशी विविध मतदान केंद्रांवर पदवीधर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर हजेरी लावली. संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठीही व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी सहभाग नोंदवत लोकशाहीप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

भंडारा येथील पीएमसी लालबहादूर शास्त्री, नगरपरिषद गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय जेसीस कॉन्व्हेंट येथे उत्साहपूर्ण  वातावरणात मतदान सुरू आहे.





  Print






Related Photos