महत्वाच्या बातम्या

 माजी आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास : कोरपना तालुक्यात अनेक तरुणांचा काँग्रेसमध्ये प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दिवाळी सणानिमित्त जनतेशी संवाद साधत काँग्रेस संघटनेला बळकटी देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना तालुक्यातील पिंपळगाव, वडगाव, कढोली यांसह विविध गावांना सदिच्छा भेटी दिल्या. या दौऱ्यादरम्यान नागरिक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत अनेक तरुणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांच्या ख्यालीखुशालीची विचारपूस करून धोटे यांनी स्थानिक समस्या आणि जनतेच्या विविध प्रश्नांची माहिती घेतली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करीत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पिंपळगाव येथे सुरू होणाऱ्या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाची पाहणी करून आयोजकांना यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका, मतदार यादी पुनरावलोकनाची एसआयआर प्रक्रिया तसेच स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील राजकीय व सामाजिक विषयांवर कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडी देशभर संघर्ष करीत आहे. हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर सक्रिय राहून जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करावे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावांत पक्ष संघटना मजबूत करावी, असे आवाहन माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले.

त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या तरुणांचे पक्षाचा दुपट्टा देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्नेहभेटीमुळे कोरपना तालुक्यात काँग्रेसच्या जनसंपर्काला बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर, युवक काँग्रेसचे शैलेश लोखंडे, वडगावचे उपसरपंच सुदर्शन डवरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास मेश्राम, शामकांत निखाडे, कढोलीचे ग्रामपंचायत सदस्य दत्ता पा. मसे, कढोली सोसायटीचे अध्यक्ष विजय बोंडे, दत्ता उपरे, शामराव केळझरकर, राजकुमार पानघाटे, रमेश लोंनबले, माजी सरपंच रेखा गोडाम, अरविंद जोगी यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos