उपराजधानी हादरली : प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
प्रियकरासोबत उभ्या असलेल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील माधव नागरी भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही आपल्या प्रियकरासोबत रस्त्यावर उभी होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तेथे चार तरुण आले आणि त्यांनी पीडित मुलीसोबतच्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या तरुणाला मारहाण करुन आरोपींनी पीडित मुलीला शेजारील शिवारात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने आपली सूत्रे हलवली आणि आपला तपास सुरू केला. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार असलेल्या तिन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नागपुरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
नागपुरात एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. फेसबुकच्या माध्यमातून आरोपीची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अनेकदा अत्याचार केला आहे. दरम्यान पीडित तरुणी दोन वेळी गर्भवती राहिली होती. त्यामुळे आरोपीने दोन्ही वेळेस गर्भपात करण्यास भाग पाडले आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
रोशन अनिल ठाकरे (वय 29) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून तो कळमना येथील ओमनगर परिसरातील रहिवासी आहे. तर 21 वर्षीय पीडित तरुणी एमबी फायनान्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. पीडित तरुणीची दोन वर्षांपूर्वी आरोपीशी फेसबुकवर ओळख झाली होती. यानंतर दोघेही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत होते. दरम्यान, 2020 मध्ये फिर्यादीच्या वाढदिवशी आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत पंचमढी येथे फिरायला घेऊन गेला.
यावेळी रोशनचा एक मित्र आणि त्याची मैत्रिण देखील सोबत होती. फिरायला गेल्यानंतर आरोपीने पीडितेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. पीडितेने याला नकार दिला. पण आपण लग्न करणार आहोत, असे सांगून आरोपीने तिला विश्वासात घेत तिच्यावर अत्याचार केला आहे. यानंतर आरोपीने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेत अनेकदा अत्याचार केला आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2021-10-08
Related Photos