चामोर्शी तालूका स्तरीय शालेय कराटे स्पर्धा लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल आष्टी येथे संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालूका स्तरीय शालेय कराटे स्पर्धा दिनांक २६ सप्टेंबर २०२६ शनिवार ला आष्टी येथील लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल आष्टी येथे चामोर्शी तालुका क्रीडा संयोजक राकेश खेवले यांच्या मार्गदर्शनाखाली व या स्पर्धेची सर्व तांत्रिक जबाबदारी कराटे प्रशिक्षक कपिल मसराम यांच्या देखरेखीखाली संपन्न झाली.
या तालुका स्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे उद्घाटन लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल चे प्राचार्य कृष्णमुर्ती गादे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षपदी उपप्राचार्य रमेश आरे, विशेष अतिथी म्हणून धनराज चंदनखेडे क्रीडा शिक्षक शिवाजी हायस्कूल चामोर्शी, मिलिंद गेडाम कराटे प्रशिक्षक गडचिरोली, विलास जिल्हापेल्ली मूख्याध्यापक डिजनीलॅन्ड स्कूल चामोर्शी, प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप सहारे, सचिन पिपरे आणि लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल चे शिक्षकवृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश खोब्रागडे तर आभार प्रदर्शन नितेश पूंगाटी यांनी केले.
या तालुका स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत चामोर्शी तालुक्यातील एकूण ४८ खेळाडूंनी सहभाग असून सदर स्पर्धा १४ वर्ष मूले/मूली, १७ वर्षं मूले/मूली, १९ वर्ष मूले/मूली असे तिन वयोगटात घेतली गेली. सदर स्पर्धेतील उत्कृष्ट सामना १४ वर्षं मूली या वयोगटात ३८ ते ४२ वजनगटात मानवी सूनिल बामणकार हिने आपल्या खेळाचे उत्कृष्ट कौशल्य व योग्य तालमेल राखत अंतिम सामन्यात विजयी झाली व उपस्थिताचे मने जिंकली तसेच १७ वर्ष मूले -३५ वजन गटात श्रीहर्ष रमेश आरे याने स्पर्धेतील आपल्या खेळाचे रोमहर्षक व चित्तथरारक झालेल्या अंतिम सामना आपल्या खेळाचे विविध कौशल्य व आधुनिक डावपेचाने अंतिम सामना जिंकत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सामना ठरला.
सदर दोन्ही खेळाडू हे लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल आष्टी येथे शिक्षण घेत आहेत. तरी या चामोर्शी तालूका स्तरीय शालेय कराटे स्पर्धेतील सर्व विजयी खेळाडूंची निवड २९ सप्टेंबर २०२६ मंगळवार ला होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धे करीता निवड करण्यात आली.
या स्पर्धेतील मुख्य पंच म्हणून मिलिंद गेडाम आणि अनिकेत हजारे यांनी तर मुख्य परिक्षक म्हणून आचल अलोणे, रिया वाट, सलोनी समूदर, राज दुर्गे यांनी कूठलाही वादविवाद न होता योग्य निर्णय देऊन स्पर्धा यशस्वी केली. तसेच गूणलेखक सानिका दूर्गे व वेळाधिकारी लावण्या कोवे यांनी सांभाळले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चामोर्शी तालुका क्रीडा संयोजक राकेश खेवले, तांत्रिक अधिकारी कपिल मसराम, शिवाजी हायस्कूल चामोर्शी चे क्रीडा शिक्षक धनराज चंदनखेडे, आणि लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल आष्टी चे क्रीडा शिक्षक नितेश पूंगाटी यांनी अधिक परिश्रम घेतले.




Petrol Price




