उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्या दौऱ्यावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 2 ऑक्टोबर रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.
2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता बापू कुटी सेवाग्राम येथे आगमन व राखीव सकाळी 10.35 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित स्टॉल व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रप्रदर्शनी पाहणी करतील. सकाळी 11.10 वाजता स्थानिक खासदार विकास निधी अंतर्गत इलेक्ट्रिक चार चाकी मोटार गाड्यांचे दिव्यांग बांधवांना वितरण, सकाळी 11.15 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी 153 वा जयंती वर्ष सेवा पंधरवाडा समारोप, जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाचे उद्घाटन, स्वातंत्र्याच अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ, हॅलो ऐवजी वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित. दुपारी सोईनुसार नागपूर कडे प्रयाण करतील.
News - Wardha