रांगी पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या योजनेसह आरडी खात्याच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात अफरातफर


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
धानोरा तालुक्यातील रांगी येथील पोस्ट ऑफिसमध्ये परिसराति लोकांनी सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत आर.डि.तसेच सेव्हिग खाते उघडले. त्यात नियमित हप्ते भरले.त्याचे शिक्के व सही केलि माञ सदर खात्यावर जमा केलेली रक्कम नसल्याने  रांगी येथील सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याची सखोल चौकशी करुण अफरातफर करणाऱ्या व्यक्तिवर कायदेशीर कारवाई करन्याची मागणी रांगी येथील डाकघर खातेदारांनी, डाक अधिक्षक चंद्रपूर विभाग, चंद्रपुर यांना दिलेल्या निवेदनातुन खातेदारांनी केली.  
दिनकर रामसाथ कोडाप यांनी रांगी येथिल पोस्ट आँफिस मधे दिनांक ११ फरवरी २००७ ला सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत स्वरीका दिनकर कोडाप या नावाने खाते उघडले. प्रथम खात्यात १ हजार रुपये भरले. त्यानंतर दिनांक ३१ मार्च २०१८ ला ११ हजार, दिनांक ७ सप्टेंबर २०१९ ला १२ हजार तर ०१ जुलै २०२० ला ९ हजार २०० रुपये कार्यालयात भरले. सदर पोस्ट मास्तरने पासबुक मधे नोंद घेवून शिक्के मारुण दिले.
मात्र दिनांक २४जुलै २०२१ रोज शुक्रवारला कार्यालयीन उपविभागिय निरिक्षक कविन्द्र डी. भस्मे दक्षिण उप गडचिरोली यांनी पासबुक तपासणी करीता कार्यालय रांगी येथे बोलाविले असता, सदर खात्यावर फक्त १हजार ३७६ रुपये आढळले. बाकीचे ३५ हजार रुपये गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा खातेदाराच्या लक्षात आले.           
तसेच येथिल डाकघर मध्ये शासनाच्या विविध योजने अंतर्गत सेव्हिग खाते पाँलिसी, आर. डी. व सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत पैशाची गुंतवनुक केली. मात्र  अनेक लोकांनी भरलेल्या पैशाचा हिसाब कुणाला कळलेला नाही. भरलेल्या पैशाची नोंद पुस्तकात केली आहे. अस खातेदारांचे म्हणने आहे. मात्र ऑनलाईन खात्यावर पैसेच नाहीत.काही लोकांची आरडी मुदत होवुनही पैसेच मिळाले नहीत.असा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडलेला आहे.बहुतेकांच्या भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याची झालेल्या अफरातफर बाबत चौकशी करन्यात यावी. गहाळ झालेली रक्कम आमच्या  खात्यात जमा करावी. व अफरातफर करणाऱ्या व्यक्तिवर कायदेशीर कार्यवाही करन्याची मागणी दिनकर कोडाप, संजय गडपायले, नरेन्द्र भुरसे, जयंत साळवे निकेश्वर पटले, हेमचंद जांभुळकर, विलास नाकतोडे, देवानंद चापळे यासह खातेदारांनी केली आहे. येथील अनेक लोकांच्या आर. डी. खात्यातील मुदत ठेविचा कालावधीत  संपूर्ण रक्कम जमा झालेली नाही .तसेच अनेक खात्यात गोधळ आहे. येथिल कारभार रामभरोशाचाच दिसुन येतोय मागिल काही काही वर्षा पासुन तपासणी का केली नाही? अधिकार्याचे काही साटेलोटे आहे का? अनेकांनी मेहनतीने जमाकेलेल्या पैशाची अशा पद्धतीने अफरा तफर होत असेल तर लोकांनी पोस्ट आँफिसवर विश्वास ठेवायचा तरी कसा? असा प्रश्न परिसरातील लोक विचारीत आहेत. संपुर्ण पोस्ट खात्याची चौकशी करुण योग्य कारवाई करण्याची मागणी मा. दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव भारत सरकार, खासदार अशोक नेते ,जिल्हाधिकारी गडचिरोली, उपअधिक्षक डाक कार्यालय गडचिरोली यांना पाठविलेल्या निवेदनातुन खातेदारांनी केली आहे.    
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-08-14Related Photos