महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय इंग्रजी माध्यम येथे १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला कृष्णा लाभे तसेच वाणिज्य विभागप्रमुख व अर्थशास्त्र विषयाच्या संगीता खोब्रागडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागप्रमुख प्रा. दिव्या वर्मा होत्या.
अध्यक्षीय भाषणात दिव्या वर्मा यांनी हिंदीचे महत्त्व स्पष्ट करत देशभरात हिंदी भाषेचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी कृष्णा लाभे यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. संगीता खोब्रागडे यांनी भारतातील काही राज्यांमध्ये आवश्यकतेनुसार हिंदी भाषेचा वापर केला जात नसल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी संजीवनी उपाध्याय हिने केले. विद्यार्थिनी श्रावणी पेंदाम हिने प्रास्ताविक केले, तर समर्थ कावेरी यांनी आभार मानले.




Petrol Price




