कब्रस्तानातील पाण्याची मोटारही चोरट्यांनी सोडली नाही : विसापुरात चोरीची घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मृतांच्या स्मृती जपणाऱ्या आणि धार्मिक विधींसाठी महत्त्वाच्या असलेल्या विसापूर येथील नुरानी कब्रस्तानालाही चोरट्यांनी सोडले नाही. कब्रस्तानातील बोअरवेलची पाण्याची मोटार, पंप आणि अन्य साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.
शुक्रवारी दुपारी जुम्म्याच्या नमाजनंतर मुस्लिम समाजातील नागरिक नुरानी कब्रस्तानात सामूहिक फातिहा पठणासाठी गेले होते. यावेळी कब्रस्तानातील बोअरवेलची पाण्याची मोटार, पंप आणि अन्य साहित्य गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असलेले साहित्यच चोरीला गेल्याने नागरिकांना धक्का बसला. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर नुरी मशीद समितीच्या वतीने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.




Petrol Price




