घाटंजी; सन्शयीत आरोपी विरुद्ध खुन करण्याचा प्रयत्न करणे व अट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा पारवा पोलीस ठाण्यात दाखल : आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटन्जी तालुक्यातील कुर्ली येथील सन्शयीत आरोपी चन्द्रशेखर उर्फ शेखर अशोक रेन्डलावार याने किरकोळ भान्डणावरुन अविनाश सुभाष आत्राम (३२, रा. कुर्ली ता. घाटंजी जि. यवतमाळ) यास लाकडी दान्ड्याने मारहाण करुन, गम्भीर जखमी करुन व उजवा पाय तोडल्या प्रकरणी फिर्यादी पत्नी कालीन्का अविनाश आत्राम यान्च्या जबानी रिपोर्ट वरुन, अपराध क्रमान्क ५४६/२६ अन्वये भारतीय न्याय सहिंता खुन करण्याचा प्रयत्न करणे १०९ (१), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतीबन्धक कायदा १९८९ अट्रॉसिटी ऍक्ट ३ (२)(V) अन्तर्गत पारवा पोलीस ठाण्यात गम्भीर स्वरुपाचा गुन्हा नोन्दविण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा पारवा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक गोपाल राठोड यांनी कायमी केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पान्ढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक, व तथा उप विभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (IPS) हे करित आहे. दरम्यान, सन्शयीत आरोपी शेखर यांस तातडीने अटक करण्यात आली आहे.
गम्भीर जखमी अविनाश सुभाष आत्राम सद्या यवतमाळच्या वसन्तराव नाईक शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल आहे. तथापि, अविनाश सुभाष आत्राम विरुद्ध पारवा पोलीसान्नी या पुर्वीच तडीपारीचा (हद्दपार) प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ यांचे कडे पाठविल्याचे खात्रीलायक, व विश्वासनिय वृत्त आहे.
कालीन्का अविनाश आत्राम यांच्या जबानी रिपोर्ट नुसार, मी व माझे पती अविनाश सुभाष आत्राम (वय ३२, रा. कुर्ली ता. घाटंजी) आम्ही दोघेही एकत्र राहतो. तसेच ते चिकन विक्रीचे दुकान चालवितात. आमच्या घराच्या ४/५ घराच्या अन्तरावर चन्द्रशेखर उर्फ शेखर (वय ३५) हा राहतो. २ सप्टेम्बर २०१० रोजी रात्री २ वाजता शौचालय करिता घरुन गेले होते. तदनन्तर सदरची घटना घडली.
सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक, व तथा उप विभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (IPS) करित आहे.




Petrol Price




