पोंभुर्ण्यात कटर मशीन चोरीचा छडा : ५० हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोंभुर्णा येथे कटर मशीन चोरीच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि पोंभुर्णा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छडा लावला. या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेली ५० हजार रुपये किमतीची कटर मशीन जप्त करण्यात आली. ही कारवाई २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
पोंभुर्णा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी आणि चोरीस गेलेल्या साहित्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक गस्तीवर असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोंभुर्णा पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. यावेळी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली ५० हजार रुपये किमतीची कटर मशीन जप्त करण्यात आली.
या प्रकरणात प्रमोद श्रीनिवास तोरे ३० वर्ष रा. चिंतलधाबा, ता. पोंभुर्णा), चंद्रशेखर विठ्ठल कुळमे ३६ वर्ष, रा. केमारा, ता. पोंभुर्णा), राजकुमार घुंगरू मरसकोल्ह ३६ वर्ष, रा. पोंभुर्णा) आणि सचिन दामोदर पेंदोर ३८, वर्ष रा. पोंभुर्णा) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या मूल उपविभागातील पथकाने आणि पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.




Petrol Price




