रविवारला चामोर्शी येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : संत निरंकारी मिशन नवी दिल्ली शाखा चामोर्शीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन चामोर्शी येथील संत निरंकारी सत्संग भवनात रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी मिशन नवी दिल्ली तर्फे मानवतेला उपयुक्त असे अनेक उपक्रम संपूर्ण विश्वामध्ये राबविले जातात.त्याच अनुषंगाने शाखा चामोर्शीच्या वतीने दरवर्षी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर तसेच स्वच्छता अभियान यासारख्या उपक्रमाचे आयोजन केल्या जाते.
रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करून मानवतेच्या या कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मिशनचे झोनल इन्चार्ज किशन नागदेव, शाखा मुखी अशोक बोरकुटे, सेवादल संचालक भोजराम लंजे यांनी केले आहे.




Petrol Price




