धानाच्या शेतीसाठी रेगडी जलाशयाचे पाणी तात्काळ सोडावे


- आमदार देवरावजी होळी यांना शेतकऱ्यांचे निवेदन
- धान निघण्याच्या काळात एका पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने केली मागणी
- अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पाणी सोडण्याबाबत दिले निर्देश
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : धान पीक ऐन निघण्याच्या मार्गावर असताना व धानाला एका पाण्याची नितांत आवश्यकता असतांना कन्नमवार रेगडी जलाशयाच्या नहारातून येणारे पाणी बंद करण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे या जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांसाठी तात्काळ सोडण्यात यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी स्थानिक परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होवून आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार देवरावजी होळी यांना त्यांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात दिले.
याबाबत आमदार देवराव होळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार रेगडी जलाशयाचे पाणी सोडण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
News - Gadchiroli