माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते कांदोळी येथे विकास कामांचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील कांदोळी येथे माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
कांदोळी हे अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळखले जाते. याठिकाणी विविध विकास कामे करून विकास करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रयत्न केले जात आहे. त्याअनुषंगाने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठी निधी खेचून आणली आहे. नुकतेच माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. बरेच वर्षानंतर याठिकाणी विविध विकास कामे होत असल्याने परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.
भूमिपूजन प्रसंगी येथील सरपंच बाजीराव आत्राम, माजी जि प सदस्य ज्ञान कुमारी कौशी, येमलीचे सरपंच ललिता मडावी, नगरपंचायतचे गटनेते जितेंद्र टिकले, राकॉ चे कार्याध्यक्ष संभाजी हिचामी, ग्रा. प सदस्य झुरु मडावी, उपसरपंच जींनी मडावी,ग्रा. प सदस्य सविता उसेंडी, ग्रा प सदस्य लता गावडे आदी गावातील नागरीक उपस्थित होते.
News - Gadchiroli