महत्वाच्या बातम्या

 शरद क्रिडा महोत्सव 2023 कबड्डीचे टागोर मंडळ मानकरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : युवकांच्या कलागुणांना भरारी मिळावी त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करता यावी या उद्देशाने शरद युवा क्रीडा महोत्सव-२०२३ निमित्त श्री किल्ला हनुमान बहुद्देशीय संस्था व व्यायाम शाळा द्वारे जिल्हा स्तरीय तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्या आदेशानुसार या क्रीडा महोत्सव घेण्यात आले. 

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, युवक जिल्हाध्यक्ष इंजि.राकेश सोमानी, श्री किल्ला हनुमान व्यायाम शाळाचे अध्यक्ष सूर्यकांत साळवे होते. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार टागोर क्रीडा मंडल चंद्रपूर यांनी पटकावला त्यांना पुरस्कार म्हणून ४०,००० रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देण्यात आले तर द्वितीय पुरस्कार श्री. राम बालक आखाडा बल्लारपूर यांनी पटकावला त्यांना पुरस्कार म्हणून २५,००० रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देण्यात आले. बल्लारपूर शहरातील व जिल्ह्यातील प्रेक्षकांनी उत्फुर्स प्रतिसाद दिल्याने मैदानात प्रेक्षकांनी भरगच्च भरली होती.

या स्पर्धेसाठी सुमित (गोलु) डोहणे, आरिफ सरोवर खान, अमर रहीकवार, सुरेश सातपुते, प्रकाश मुसले, जगदीश सातपुते, प्रणित सातपुते, सागर कुकडकर, श्रीनिवासन ढोडरे, शुभम जानेकर, साईनाथ सातपुते, कुणाल मोरे, निखिल सल्लम, सौरभ मंगर, विकास मंगर, अनिल कुकडकर, राहुल चनेकर, कार्तिक खेडेकर, विनोद ढोडरे, सुजित पूसम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व श्री किल्ला हनुमान शाळेचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos