पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उद्या वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या ५ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता नागूपर येथून वर्धाकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५ वाजता वर्धा येथे आगमन व पोलिस मुख्यालय येथे आयोजित महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलिस प्रदर्शनीस उपस्थिती. सायंकाळी ५.३० वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. रात्री ८.३० वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ९.३० वाजता वर्धा येथून चंद्रूपर कडे प्रयाण करतील.
News - Wardha