पत्रकार स्नेहा मडावी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा येथील पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना प्रतिष्ठित राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पुण्यातील नवी पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड) च्या गणेश हॉलमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.
पुणे जिल्ह्याचे माजी न्यायमूर्ती नामदेव चव्हाण यांच्या शुभहस्ते हा गौरव करण्यात आला. माणूस परिवार महाराष्ट्र राज्य प्रणित आदर्श कार्यकर्ता गौरव सेवा समितीच्या वतीने या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक समितीचे अध्यक्ष दुष्यंत राजे जगताप हे होते, तर प्रसिद्ध लेखक डॉ. दत्ताजी कोहिनकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र अशोक केदार यांचाही दुष्यंत राजे जगताप यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाला नगरसेवक पल्लवी जावळे, गणेश कल्याणकर, कल्पना बहिरट, ऐश्वर्या थोरात, धनंजय जाधव, राजेंद्र काकडे आणि गोपाळ तिवारी उपस्थित होते. तसेच दत्तात्रय पासलकर, प्रशांत गांधी, सुरेश जैन, विजयकुमार मार्लेचा, अविनाश गोगावले, स्वाती पवार-शिंदे, राजेश कोंढरे, विलास कुडले, संतोष जावळकर, अमित जावळकर, रूपे आणि किरण मते यांसह पत्रकार व मीडिया क्षेत्रातील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहा मडावी यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




