महत्वाच्या बातम्या

 वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत : शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर आकर्षक सजावटीने नटविण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे टिळक लावून तसेच फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. यामुळे शाळेत आनंददायी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. यानंतर मुख्याध्यापक विजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना परिश्रमपूर्वक अभ्यास, शिस्तीचे पालन आणि नवीन शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी प्रेरित केले. तसेच सर्व शिक्षकांना त्यांच्या वर्गांचे वाटप करून शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

यावळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक खेळांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत मानकर, संस्थापिका रझिया खान, शबिस्ता सिराज, फरजाना शेख, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवीन शैक्षणिक सत्र विद्यार्थ्यांसाठी यशस्वी, प्रगतीशील आणि उज्ज्वल ठरो, अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका निहारिका हयारन, सुमन प्रजापती आणि राखी तुमराम यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका प्रीती गोविंदवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.





  Print






News - Chandrapur




Related Photos