किन्ही येथे सामूहिक फळबाग लागवड कार्यक्रमाचे शुभारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : किन्ही येथील वनहक्क जमिनीच्या जागेवर ग्रामपंचायत किन्ही व आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कीन्ही येथे १०ऑक्टोम्बर २०२२ ला सामूहिक फळबाग लागवड उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन तर्फे विविध प्रकारच्या फळझाडांची रोपे व खते उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर ग्रामपंचायत कीन्ही यांच्या तर्फे सामूहिक वनहक्क जमिनीच्या ७ एकर जागेवर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मध्यमातून त्या रोपांचे संगोपन व संवर्धन करून भविष्यातील भेळसावणाऱ्या रोजगाराच्या संबंधाने गावातील नागरिक पलायनाच्या समस्येवर आळा बसणार असून गाव स्वावलंबी व स्वयंरोजगारपूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. या स्तुत्य उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष पंचायत समिती कार्यालय चे अभियंता मा. सिडाम साहेब, ग्रामपंचायत कीन्हीचे सरपंच भारत गेडाम, वामन पेंदाम, कृषिमित्र रेवन गुरनुले, जनार्दन गावंडे, वामन भेंडारे, निलेश बोडकुलवार, हीवराज लोणारे, तोमेश गुरनुले, आकाश गेडाम साहेब रोजगार सेवक ग्रा. प. कीन्ही, आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन चे विकास अधिकारी मा. सतीश सामृतवार, राकेश पाखमोडे व रो.ह.यो कामगार तसेच समस्त कीन्हीं ग्रामवासीय उपस्थित होते.
News - Gadchiroli