श्रीमती सिंधुताई पोरड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोगाव येथे श्रीमती इंदिरा गांधी जयंती साजरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : श्रीमती सिंधुताई पोरड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोगाव येथे श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य तळवलकर, प्रा. मुनघाटे, प्रा. पुंजे, प्रा.मने, बोमनवार, पुसदेकर, न्यायमूर्ती, सौ. विगम, सौ रघुवंशी मॅडम, नरड, प्रा. शेंदरे, प्रा. बारसागडे, प्रा.नंदनपवार, तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.
यावेळी श्रीजा चौधरी, अक्षरा मंगर, लक्ष्मी भरडकर सर्व इयत्ता ७ वी, मैत्री बांगरे संमत ठेवले ईशान करकाडे सर्व इयत्ता ६ वी, श्रेया बन्सोड इयत्ता १० वी, तसेच अश्विनी नीलेकार आणि विवेक शिडाम इयत्ता ११ वी कला या विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेऊन श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण भाष्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन राणी बावणे इयत्ता ११ वी कला हिने केले.
News - Gadchiroli