ग्रामपंचायत राजपूर प्याच व ग्रा. प. बोरी येथे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील ग्रा. प. राजपूर प्याच व ग्रा. प. बोरी येथे विविध विकास कामांचे भूमी पूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अनेक वर्षापासून लोकांच्या मागणी असताना याकडे दुर्लक्ष केले जात होते मात्र सरपंच व सदस्यांनी व गावातील प्रतिष्टीत नागरिकांनी समस्या जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे गावातील समस्या विषय सांगितले. त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे मंजूर करून गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आले आणी सदर कामांचे भूमिपूजन करण्यात आले तर गावातील नागरीक समादान व्यक्त केले.
ताशांच्या गजरात करोडो करोडो रुपयांच्या अत्यावश्यक जनतेच्या हितार्थ कामांचे भूमिपूजन, राजपूर प्याच येथे पाण्याची टाकी, वाढीव पाईप लाईन, सह हात पंप भूमिपूजन, रामपूर चेक येथे जनसुविधा योजने अंतर्गत नाली बांधकाम सह शोष खड्डे बांधकामाचे भूमिपूजन, मौजा -शिवणीपाठ येथे रोड सह हात पंप भूमिपूजन सह इतर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळेस भूमिपूजन कार्यक्रमाला बोरी नागेपल्लीचे माजी ज़िल्हा परिषद सदस्य सुनिताताई कुसनाके, माजी पंचायत समिती सदस्य छायाताई पोरतेट, बोरी ग्रामपंचायतचे सरपंच, शंकर कोडापे, उपसरपंच परागजी ओलालवार, राजपूर ग्रामपंचायतचे सरपंच मीनाताई वेलादी, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुरेश गंगाधरीवार, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य मधुकर वेलादी, सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार, ग्रामपंचायत उपसरपंच कोकिरवार, ग्रामपंचायत सदस्य संतोष पंदीलवार, बंडू तलांडे, पांडुरंग रामटेके, मुरलीधर कोडशेपवार, मारोती पुल्लीवार, दिवाकर चाटारे, पेंटूजी अलोणे, प्रवीण निकेसर, श्रीनिवास औनूरवार, ग्रामसेवक दर्रो, सुंदराबाई मडावी माजी ग्रामपंचायत सदस्य, मुकुंदा ठाकरे माजी ग्रामपंचायत सदस्य, विलास निकसर पोलिस पाटील, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राकेश सडमेक व गावातील नागरीक उपस्थित होते.
News - Gadchiroli