चुनावी महारॅलीसाठी नागपूरला बिआरएसपी चे हजारो कार्यकर्ते रवाना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी निवडणुकाच्या प्राश्वभूमीवर मान्य. कांशीराम जयंती निमित्याने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाची नागपूर येथे भव्य चुनावी महारॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला गडचिरोली जिल्ह्यातून जिल्हा प्रभारी राज बन्सोड व जिल्ह्याध्यक्ष मिलिंद बांबोळे यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्सहात हजारोच्या संख्येने लोक रवाना झाले.
जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गडचिरोली मधून निघताना जोरदार नारेबाजी केली व गाड्या रवाना झाल्या.
BRSP चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने हे रॅलीचे मुख्य मार्गदर्शक असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गडचिरोली चिमूर क्षेत्राचा उमेदवार उतरविण्याच्या संबंधाने निर्णय घेतल्या जाणार आहे, असे जिल्हा प्रभारी राज बन्सोड यांनी सांगितले.
यावेळी बसपाचे पूर्व मंत्री व राष्ट्रीय सोषित समाज पक्षाचे स्वामी प्रसाद मोर्य, प्रो. मोहम्मद सुलेमान, उत्तर प्रदेशचे माजी खासदार रामबक्ष वर्मा, बिआरएसपी उत्तर भारत प्रभारी पृथ्वीराज आदी नेते उपस्थित होते.
News - Gadchiroli