महत्वाच्या बातम्या

 एसटी मध्ये डिजिटल प्रणालीद्वारे मिळणार तिकीट


- वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स सेवेत दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : एसटीतून प्रवास करतांना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्या पैशाची चिंता नसावी यासाठी एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करता येईल अशा सर्व वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स (ETIM) नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय किंवा क्युआरकोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे.

मे.ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने राज्य परिवहन महामंडळात सर्व वाहकांसाठी नवीन अँड्रॉइड आधारीत डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशीन घेण्यात आल्या आहेत. सध्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.

डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्यादृष्टिकोनातून, एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या युपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या अँड्रॉइड तिकीट मशीनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. अर्थात प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे तसेच सुट्ट्या पैशासाठी वाहकांसोबत होणारा विनाकारण वाद असे प्रश्न कायमचे मिटू शकते.  युपीआय पेमेंटद्वारे किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos