बोर्डा ग्रामपंचायत सरपंचाच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित
- सरपंच ऐश्वर्या खामकर यांचा तालुका महिला काँग्रेस अध्यक्षाचा राजीनामा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत बोर्ड- सुरला येथील सरपंचा च्या विरुद्ध दहा विरुद्ध दोन मतांनी मंगळवार अविश्वास प्रस्ताव पारित झाला.
वरोरा शहरा लगत असलेली बोर्डा ग्रामपंचायत ही विकसित आणि अधिक महसूल असलेली ग्रामपंचायत मानली जाते. या ग्रामपंचायत मध्ये एकूण 13 सदस्य आहेत. 2021 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐश्वर्या वसंतराव खामनकर या सरपंच पदी विराजमान झाल्या तर उपसरपंच पदी राहुल कौतिक ठेंगणे यांची निवड झाली. त्यानंतर सातत्याने या ठिकाणी धुसपुस सुरू होती. कधी विकास कामे तर कधी आर्थिक व्यवहारांबद्दल असलेली नाराजी यामागे असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राहुल ठेंगणे व इतर नऊ सदस्यांनी अविश्वासाची नोटीस तहसीलदार योगेश कोटकर यांना दिली आणि यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ला सभा घेण्यात आली. यावेळी एक सदस्य अनुपस्थित होते. तर बारा सदस्यांपैकी दहा सदस्यांनी अविश्वासा प्रस्तावाच्या बाजूने तर दोन सदस्यांनी विरुद्ध बाजूने मतदान केल्यामुळे दहा विरुद्ध दोन अशा मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाला.
या संदर्भात ऐश्वर्या खामनकर यांनी पत्रकार परिषद घेतली. सरपंच पदाची लालसा असल्यामुळे अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याचा म्हणाल्या. ग्रामपंचायत मध्ये एका माजी सरपंचांची ढवळाढवळ आणि काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहामुळे पराभव झाल्याचा आरोप खामनकर यांनी यावेळी केला. तसेच वरोरा तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमसकर यांचे कडे पाठविल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा काटकर, छाया कामडी, निता बोढाले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. आता सरपंच पदी कोण विराजमान होते याकडे लक्ष लागले आहे.
News - Chandrapur