'वीर बाबुराव शेडमाके भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी' उत्साहात संपन्न


- उपविभाग गडचिरोलीच्या महाराणा प्रताप क्लबने पटकाविले प्रथम क्रमांकाचे बक्षीस
- विजेत्या संघाचा मान्यवरांकडुन सत्कार  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी गडचिरोली :
पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून 'वीर बाबुराव शेडमाके भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी' पोलीस मुख्यालय मैदानावरील वीर शहीद पांडु आलाम या सभागृहात २४ सप्टेंबर २०२१ पासुन सुरु होती. या कबड्डी स्पर्धेचे अंतिम सामने काल २५ सप्टेंबर २०२१ रोजी पार पडले असुन गडचिरोली उपविभागाच्या महाराणा प्रताप क्लबने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेमध्ये उपविभागीय स्तरावरील स्पर्धेतील. महाराणा प्रताप क्लब (गडचिरोली), देसाईगंज कबड्डी संघ (कुरखेडा), कबड्डी संघ वाघभुमी (धानोरा), जय बजरंगबली क्लब कारवाफा (पेंढरी), कोरेली कबड्डी संघ पेरमीली (अहेरी), बाजीराव फिटनेस क्लब संघ कृष्णार (एटापल्ली), जय ठाकुरदेव क्रिडा मंडळ परसलगोंदी (हेडरी), लिटील बायस कबड्डी संघ पिटेकसा (भामरागड), जय गोंडवाना कबड्डी संघ (जिमलगट्टा), उडानबॉईज क्लब कवही संघ (सिरोंचा) अशा १० संघातील १२० खेळाडुंनी आपला सहभाग नोंदवला होता.
या १० संघामध्ये २ दिवसांपासून पोलीस मुख्यालय मैदानावर रोमहर्षक लढती पार पडल्या. यामध्ये उपविभाग गडचिरोलीच्या महाराणा प्रताप क्लब संघाने प्रथम क्रमांक, उपविभाग हेडरीच्या जय ठाकुरदेव क्रिडा मंडळाने दुसरा क्रमांक तर उपविभाग धानोराच्या कबड्डी संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे, यु-मुंबाचे टिम लिडर संदिप सिंग, यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू अजिंक्य कापरे, पोलीस उप अधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले व उप विभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा यांचे हस्ते शहीद पांडु आलाम सभागृहात पार पडला.
या वेळी प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला २५ हजार रुपये रोख, ट्राफी य संघातील सर्व खेळाडुंना प्रशस्तिपत्र, गोल्ड मेडल व यु-मुंबा टी शर्ट, तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला २० हजार रुपये  रोख, ट्राफी व संघातील सर्व खेळाडुंना प्रशस्तिपत्र, सिल्व्हर मेडल व यु-मुंबा टी शर्ट, तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला १५ हजार रुपये रोख, ट्राफी व संघातील सर्व खेळाडुंना प्रशस्तिपत्र व ब्रांझ मेडल तर उपविभाग भामरागडच्या लिटील चॉईज कबड्डी संघास उत्तेजनार्थ बक्षीस ५००० हजार रुपये रोख व सर्व खेळाडुंना प्रशस्तिपत्र देवून गौरवण्यात आले. तसेच उत्कृष्ट रायडर आशिष विश्वास गडचिरोली, उत्कृष्ट ऑलराऊंडर सुधीर मिस्त्री गडचिरोली, उत्कृष्ट डिफेंडर हर्षद नरोटे धानोरा या खेळाडुंना ट्राफी व ट्रॅकशुट देवून गौरवण्यात आले. याबरोबरच यु-मुंबाचे टिम लिडर संदिप सिंग व यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू  अजिक्य कापरे यांचा शाल श्रीफळ, मोमेटो, प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमांच्या वेळी मंचावर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे, यु-मुंबाचे टिम लिडर संदिप सिंग, यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू अजिक्य कापरे, पोलीस उप अधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले व उप विभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-26
Related Photos