महत्वाच्या बातम्या

 २१ सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : महिलांचा समस्यांचे निराकरण व्हावे व त्यांच्या समस्यांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशानेजिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येत आहे. समस्याग्रस्त व पिडीतमहिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे या हेतुने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकमहिन्याचा तिसरा सोमवार महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. महिलांचा कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तीक समस्या, गाऱ्हाणी, अडीअडचणी ऐकुन त्यांचे लेखी अर्ज स्वीकारण्यात येतील.

न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसलेले किंवा आवश्यक कागदपत्रे नजोडलेले अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज हे वैयक्तीक स्वरुपाचे असावेत व अर्ज आवश्यककागदपत्रासह तीन प्रतीत सादर करावे. अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली, बेरॅक क्रमांक १, खोली क्रमांक २६,२७ कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयात निःशुल्क प्राप्त होईल, कृपया याची नोंद घ्यावी.

दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी सोमवारी सकाळी ११.०० वाजता जिल्हा महिला लोकशाही दिनाची सभा जिल्हाधिकारीयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व पिडीत/समस्याग्रस्तमहिलांनी आपले अर्ज सदर कार्यालयात सादर करावे, याबाबत सर्व महिलांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.





  Print






Related Photos