चोप येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबाला वन विभागाकडून आर्थिक मदत : आमदार कृष्णा गजबे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील चोप येथील युवक अजित सोमेश्वर नाकाडे ३ मे रोजी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यामुळे आज १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते वन विभागाकडून ५ लक्ष रुपयांचा धनादेश अजित नाकाडे यांच्या परिवारास देण्यात आला, या प्रसंगी देसाईगंज वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, सिटी - १ वाघांना बेशुद्ध करून पकडण्यात मुख्य भूमिका बजावणारे डॉक्टर खोब्रागडे, शूटर मराठे, चोप ग्रामपंचायत सरपंच नितीन लाडे सरपंच, गौरव नागपूरकर, आत्मराम सुर्यवंशी, सोमेश्वर नाकाडे, अशोक नाकाडे, त्र्यंबक भजने, शुभम नागपूरकर, शेखर कुथे, वनरक्षक संदीप कानकाटे, सुनील कांबळे उपस्थित होते.
News - Gadchiroli