विद्यापीठ आचार्य पदवी पूर्व परीक्षा एम. पेट २०२२ परीक्षाबाबत सूचना


- ११ केंद्रावर होणार परीक्षा संबंधितांना नोंद घेण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम.पेट) २०२२ परीक्षा २६ व २७ नोव्हेंबर २०२२ रोजी ११ परीक्षा केंद्रांवर सकारी ११.०० ते १.०० व दुपारी ३.०० ते ५.०० या वेळात संपन्न होणार आहे.
सदर परीक्षेकरिता केंद्र निश्चित करण्यात आले. असून त्यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँन्ड टेक्नॉलॉजी, अकोला, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँन्ड टेक्नॉलॉजी, अमरावती, डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिटुट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड रिसर्च, अमरावती, ए.आर.एन. असोसिएट्स, अमरावती, प्रो. राम मेघे इन्स्टिटुट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड रिसर्च, बडनेरा, पी.जी. डिपार्टमेन्ट ऑफ कॉम्प्युटर सायन्स, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, पंकज लढ्ढा इन्स्टिटुट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड मॅनेजमेंट स्टडीज, बुलढाणा, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव, माऊली गृप ऑफ इन्स्टिटुटशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँन्ड टेक्नॉलॉजी, शेगांव, आबासाहेब पारवेकर कला, वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ व जवाहरलाल दर्डा इन्स्टिटुट ऑफ इंजिनिअरींग अँन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ या केंद्रांचा समावेश आहे.
तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले. अधिक माहितीकरीता परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील (९७६३८३३९६९) व आचार्य कक्षाच्या सहा. कुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर (९४२२६२३३८१) यांचेशी संपर्क साधता येईल.
News - Rajy