सागवान तस्करीप्रकरणी गडचिरोलीत मोठी कारवाई : क्षेत्र सहायक विनोद गोल्लेवार तडकाफडकी निलंबित:


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागात सागवान तस्करीच्या प्रकरणात हात असल्याचा ठपका ठेवत आसरअल्ली वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहायक वनपाल विनोद रामजी गोल्लेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक, गडचिरोली यांच्या कार्यालयाकडून २५ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम, १९७९ च्या नियम ४ (१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून गोल्लेवार यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. भामरागड येथे मुख्यालय: निलंबनाच्या कालावधीत विनोद गोल्लेवार यांचे मुख्यालय उपवनसंरक्षक, भामरागड वनविभाग हे निश्चित करण्यात आले आहे. भामरागडच्या उपवनसंरक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
विभागीय चौकशीचे आदेश: सिरोंचा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियम ८ अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्यासाठी दोषारोप पत्र तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास निर्वाह भत्ता रोखण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.




Petrol Price




