संतापजनक : ६ महिन्यांच्या बाळाला दिले चुकीचे रक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लखनऊ : 
मध्य प्रदेशात एक मोठा आणि धक्कादायक आणि संतापजनक  प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.  ६ महिन्यांच्या मुलाला चुकीचे रक्त चढवल्याचा हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या चिमुकलीला रक्त चढवल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली. या संतापजनक प्रकारानंतर कुटुंबियांनी तातडीने तक्रार घेऊन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.
तापामुळे, गोंदिया गावचे माजी सरपंच उज्जैन खासगी दवाखान्यात आपल्या ६ महिन्यांच्या नातवाची तपासणी करण्यासाठी पोहोचले होते. ज्या ठिकाणी डॉक्टरांनी कुटुंबासह मुलाला रक्तासाठी शहरातील सुपर स्पेशालिस्ट लॅबमध्ये पाठवले. मुलाच्या ब्लड रिपोर्ट B+ म्हणून दिला गेला.
अहवालानुसार, डॉक्टरांनी डेंग्यू असल्याचे सांगून मुलाला दाखल करण्यास सांगितले. तसेच २ युनिट रक्त आणण्यास सांगितले. जे कुटुंबाने आणले आणि मुलाला रक्त दिले गेले. जेव्हा अचानक मुलाची तब्येत बिघडू लागली तेव्हा मुलाची रक्ताची तपासणी पुन्हा केली गेली. ज्यामध्ये त्याचा रक्तगट B- असल्याचे आढळून आले. त्यानंतर मुलाला पुन्हा बी निगेटिव्ह रक्त चढवण्यात आले. त्यानंतर मुलाची प्रकृती स्थिर झाली.
  Print


News - World | Posted : 2021-09-11Related Photos