चरणजीत सिंह चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / चंदिगढ :
पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील. हरीश रावत यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. चन्नी दलित समाजातून येतात. ते कॅप्टन सरकारमध्ये मंत्री होते.
चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत.
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचे नाव होते. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.  Print


News - World | Posted : 2021-09-19
Related Photos