चला जाणूया नदीला या अभियानाच्या सहाय्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या अभियानाच्या सहाय्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॅा. विपिन इटनकर हे या समितीचे अध्यक्ष असतील.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर हे या समितीचे सहअध्यक्ष असतील. तर जिल्हा वनसंरक्षक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आदी शासकीय अधिका-यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. कमाल २९ मान्यवरांची ही समिती असेल. समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्यापासून एक वर्ष अथवा पुढील आदेश होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत राहणार आहे.
News - Nagpur