भंडारा ग्रंथोत्सवात दोन दिवस बौद्धिक मेजवानी
- परिसंवाद, कवि संमेलनासह व्याख्यानाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्हा ग्रंथोत्सवात दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्या 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटनानंतर परिसंवाद व कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा ग्रंथोत्सव 2022 . 4 व 15 फेब्रुवारी रोजी जकातदार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन विक्री तसेच विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रंथपुजन व दिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांच्याहस्ते करण्यात येईल. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय महाकवी डॉ. सुधाकर गायधनी तर अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील मेंढे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार नाना पटोले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षिरसागर, सहायक ग्रंथालक संचालक मिनाक्षी कांबळे आदी उपस्थित राहतील. यावेळी पद्मश्री परशुराम खुणे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल.
त्यानंतर सामाजिक विकासात ग्रंथालयाची भुमिका या परिसंवादामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, विदर्भ महाविद्यालय, लाखनीचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सुरेश खोब्रागडे, जेष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार हे सहभागी होतील. या परिसंवादाच्या अध्यक्षा जेष्ठ साहित्यिका डॉ. मंजूषा सावरकर असतील. त्यांनतर दुपारच्या सत्रात 3 ते 5 दरम्यान कवी संमेलन होईल. यामध्ये कवी प्रमोदकुमार अणेराव, प्रसेनजित गायकवाड, विनोद गहाणे, सुनिता झाडे, विवेक कापगते कवीता सादर करतील. कवी संमेलनाचे अध्यक्ष लखनसिंग कटरे हे असतील. ग्रंथोत्सवच्या दुसऱ्या दिवशी 15 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता वाचन चळवळीत वृत्तपत्रांची भूमिका यावर लोकसत्ता वृत्तपत्राचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचे व्याख्यान होणार आहे.
दुपारी 12 ते 2 दरम्यान वाचन आणि तंत्रज्ञान या विषयावर महाचर्चा होणार आहे. यामध्ये वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी शैलजा (वाघ) दांदळे, माजी प्राचार्य व ग्रंथालय विभाग प्रमुख स्वावलंबी शिक्षण महाविद्यालय वर्धा डॉ. उमाजी नाल्हे, ग्रंथालय मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालय नागपूर डॉ. प्रिंस अजयकुमार आगासे, ग्रंथपाल एन.जे.पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय मोहाडी डॉ. प्रमोद वरखडे सहभागी होणार आहे. दुपारी 2.30 ते 4 दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ग्रंथोत्सवचा समारोप होणार असून समारोपाला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त मंजूषा ठवकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बाबासाहेब देशमुख, अध्यक्ष जिल्हा साहित्य परिषद गुरूप्रसाद पाखमोडे, अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ धनंजय दलाल, मुख्याध्यापक जकातदार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एम.जी.कुर्जेकर उपस्थित राहतील.तरी जिल्ह्यातील सर्व साहित्य प्रेमी, विद्याथी, माध्यम प्रतिनीधी, ग्रंथालय चळवळीतील ग्रंथोपसकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले आहे.
News - Bhandara