महत्वाच्या बातम्या

 कोरची : स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची येथिल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या कुरखेडा शाखा कोरची येथे राष्ट्रनिर्माते, आधुनिक भारताचे जनक, सामाजिक क्रांतिचे पितामह, स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ज्येष्ठ शिक्षक यशवंत कावळे यांच्या अध्यक्षतेखाली, नंदलाल सोरी, हेमराज सुकारे पदवीधर शिक्षक, अगनु गोटा तसेच पतसंस्थेचे सचिव जितेंद्र साहाळा, संचालक हिरासिंग बोगा, महिला संचालक कु. रेशमा कंगाली यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी नरेश रामटेके, शाम जमकातन, सुरेंद्र दमाहे, गोपाल कोरेटि, नामदेव बागडेरिया, लोकचन्द जमदाळ, प्रकाश उइके, फत्तेसाय होळी, पतसंस्थेचे कर्मचारी पंकज मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन नरेश रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन हिरासिंग बोगा यांनी केले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos