गडचिरोलीतील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात खांदेपालट करण्यात आली आहे. राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने ३० जानेवारीला जारी केले. यात नक्षलप्रभावित गडचिरोलीमधील १० अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्या जागी नवे अधिकारी येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वजिल्ह्यात कार्यरत असलेल्या तसेच ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती मागवली होती. यानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी १३० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.
News - Gadchiroli