महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


८ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१८३१ : विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.सुट्टी पॅकेज निवडा

१८५७ : ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी

१९०० : अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.

१९४४ : दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.

१९५४ : साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.

१९६२ : स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९६६ : स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.

१९९१ : मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.

२००० : सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

२००१ : लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.खगोलशास्त्र कोर्स शोधा

२०२२ : नेताजी सुभाषचंद्र बोस - यांच्या २८ फूट उंच, इंडिया गेट, दिल्ली येथील पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले.

८ सप्टें

११५७ : इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल ११९९)

१८३० : नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.

१८४६ : भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९२६)

१८४८ : जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७)डिजिटल कॅलेंडर निवडा

१८८७ : योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९६३)

१९०१ : दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.

१९१८ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.

१९२५ : इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)

१९२६ : संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)

१९३३ : जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.

१९३८ : जपानी यॉटस्मन, पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे पहिली व्यक्ती, तसेच वयाच्या ८३ व्या वर्षी पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती केनिची होरी यांचा जन्म

१६४७ : बकिंगहॅम आणि नॉर्मनबीचा पहिले ड्यूक, इंग्रजी कवी आणि राजकारणी, कौन्सिलचे लॉर्ड अध्यक्ष जॉन शेफिल्ड यांचा जन्म (मृत्यू : २४ फेब्रुवारी १७२१)

१२७१: हंगेरी देशाचे राजा चार्ल्स मार्टेल यांचा जन्म (मृत्यू : १२ ऑगस्ट १२९५)

८ सप्टेंबर मृत्यू

७०१: ७०१ई पूर्व : पोप सर्गिअस (पहिला) यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर ६८७)

१९३३ : इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.

१९६० : इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)

१९६५ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.

१९७० : मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १८९४)

१९८० : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.

१९८१ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन.

१९८१ : अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९७)

१९८२ : जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०५)डिजिटल कॅलेंडर निवडा

१९९१ : कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१३)

२०१० : कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन. (जन्म: १९ मे १९६४)

२०२२ : भारताचे २२वे सरन्यायाधीश कमल नारायण सिंग यांचे निधन (जन्म: १३ डिसेंबर १९२६)

२०२२ : इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचे निधन (जन्म: २१ एप्रिल १९२६)

१९९७ : पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचे निधन (जन्म: १८ जून १९११)

१९६५ : अमेरिकन उद्योगपती, लिओनेल कॉर्पोरेशन कंपनीचे सह-संस्थापक जोशुआ लिओनेल कोवेन यांचे निधन (जन्म: २५ ऑगस्ट १८७७)

१९३९ : भारतीय तत्त्वज्ञ, रामकृष्ण वेदान्ता मठाचे संस्थापक स्वामी अभेदानंद यांचे निधन (जन्म: २ ऑक्टोबर १८६६)खगोलशास्त्र कोर्स शोधा

७८० : बायझंटाईन सम्राट लिओ चौथा खझर यांचे निधन (जन्म: २५ जानेवारी ०७५०)





  Print






Related Photos