महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या विभागस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी U-१४ संघाची झेप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या १४ वर्षांखालील (U-१४) बास्केटबॉल संघाने दमदार कामगिरी करत विभागस्तरीय स्पर्धेसाठी झेप घेतली.

स्पर्धेदरम्यान विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, वेगवान हालचाली, अचूक पासिंग, प्रभावी बचाव आणि गोल करण्याची क्षमता यांचे उत्तम प्रदर्शन केले. प्रत्येक सामन्यात आत्मविश्वासाने व जिद्दीने खेळ करत संघाने उल्लेखनीय कामगिरी केली.

या संघातील आयुष प्रकाश नेताम, पवन छत्रपती बांगरे, गौख समाजी गोहने, अमीत अविनाश, छायांक गिरीश, ऐश्वर्यकुमार श्रीपुरानांत, चिन्मय किशोर, दक्ष संदीप धुहारी, गौरख हितेंद्र चुटे, महिंद्रकुमार डे, निखिल सादीचे आणि नरेश बैरवार या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या खेळाडूंना प्रशिक्षक साहिल राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी नियमित सराव, शारीरिक तंदुरुस्ती, तांत्रिक कौशल्य आणि सांघिक समन्वयावर विशेष भर देत स्पर्धेची तयारी केली.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, शिक्षकवृंद व क्रीडा विभागाच्या वतीने सर्व खेळाडू व प्रशिक्षक साहिल राऊत यांचे अभिनंदन करण्यात आले. विभागस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.





  Print






Related Photos