इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण आग लागल्याने ४० कैद्यांचा होरपळून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जकार्ता :
इंडोनेशियामध्ये भयंकर दुर्देवी घटना घडली आहे. देशातल्या बॅन्टेन प्रांतातील तुरुंगात भीषण आग लागली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या भीषण आगीत ४० कैद्यांचा मृत्यू झाला आहे.
कारागृह अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीच्या दुर्घटनेत ४० कैद्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरले होते. आज सकाळी १ किंवा २ च्या सुमारास आग लागली. यावेळी जास्तकरुन कैदी झोपले होते. या आगीत अनेक कैदी गंभीर जखमी झालेत. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  Print


News - World | Posted : 2021-09-08
Related Photos