भाजपविरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीच्या नोटीसा का ? : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकरणानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून नोटीसा पाठवण्याचे सत्र सुरू आहे.  परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या वाशीम इथल्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठवल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपविरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीच्या नोटीसा का? असा नाना पटोले यांनी केला आहे. 
नाना पटोले म्हणाले, 'मला भाजपला आणि ईडीला एक प्रश्न विचारायचा आहे.  भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. चुकीचे  केले असेल तर कारवाई झाली पाहिजे. पण भाजपतील सगळे दुधाने धुतलेले आहेत का? भाजपच्या लोकांवर कारवाई का होत नाही. असे नाना पटोले म्हणाले. 
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-30


Related Photos