महत्वाच्या बातम्या

 खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याची केंद्र सरकारला विनंती करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलत होते.

सांगली जिल्ह्यात शेतकरी रासायनिक खत खरेदी करत असताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. यामध्ये जातीचा उल्लेख आहे हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या मुद्द्यावर आवाज उचलला होता. पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. पुरोगामी महाराष्ट्रात जाती-पातीला थारा नाही. सरकार तातडीने जात विचारण्याचे प्रकार थांबवावे व संबंधित सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा, अशी मागणी पटोले यांनी केले होते. 





  Print






News - Rajy




Related Photos