आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / अहेरी : धर्मराव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालित राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालय, भामरागड तथा मेरा युवा भारत (MY Bharat), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सुनील बिस्वास यांच्या हस्ते तर मुख्य अतिथी राजू कोठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे फायदे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सामूहिकरीत्या सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, विविध योगासने तसेच शारीरिक तंदुरुस्ती वाढविणारे व्यायाम यांचा सराव केला. योगामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व योग प्रशिक्षण प्रा. विशाल तावेडे (शारीरिक शिक्षण संचालक) यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ. हेमराज लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लिपिक रूपलाल गोंगले, प्रशांत आगलावे तसेच शिपाई सुनील ताजने, रमेश गडगे, बंडू बोनडे व विवेक येरगुडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




