महात्मा फुले महाविद्यालयात नशामुक्ती जनजागृती : विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक प्रतिज्ञा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारत सरकारच्या दहा कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानांतर्गत ६ ते २० ऑगस्ट २०२६ महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभाग व सैन्यविज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर व महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रा. रजत मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभरात राबविण्यात येत असलेल्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा भाग म्हणून आयोजित कार्यक्रमात कन्याकुमारी शमा बहन, स्मिता दीदीजी व विनोद भैयाजी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून सुदृढ, निरोगी व जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेत समाजात व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले. त्यांनी नशामुक्ती अभियानाची उद्दिष्टे, व्यसनमुक्त भारत निर्माण करण्यासाठी युवकांची भूमिका तसेच सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ले. प्रा. योगेश टेकाडे यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहून शिक्षण, चारित्र्य आणि राष्ट्रनिर्मितीसाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली राम यांनी केले, तर रागिणी टेकाम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
News - Chandrapur




Petrol Price




