चंद्रपूरमध्ये JCI गारिमाने राबविले सस्टेनेबल सिपिंग जनजागृती अभियान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : JCI चंद्रपूरच्या गारिमा विभागाने JCI इंडियाच्या सस्टेनेबल सिपिंग उपक्रमाअंतर्गत २० एप्रिल ते १० मे या कालावधीत एक महत्त्वपूर्ण जनजागृती अभियान राबविले. या अभियानाचा मुख्य उद्देश प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी करून स्टीलच्या बाटल्यांचा वापर वाढवणे हा होता.
अभियानादरम्यान कामगार वर्गातील कर्मचारी तसेच गरजू नागरिकांना १०० स्टील बाटल्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, आरोग्य सुरक्षितता आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैली या मुद्द्यांवर जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये असलेली हानिकारक रसायने आरोग्यास अपायकारक ठरू शकतात, तर स्टीलच्या बाटल्या सुरक्षित, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक आहेत. त्यांनी असेही नमूद केले की, एक स्टील बाटली वापरल्याने हजारो प्लास्टिक बाटल्यांचा कचरा कमी करता येतो.
अभियानादरम्यान उपस्थित नागरिकांना स्टॉप प्लास्टिक, स्टार्ट स्टील हा संदेश स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर प्लास्टिकमुक्त जीवनशैलीकडे नागरिकांची जाणीव वाढण्यास मदत झाली असून, पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




