महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नीट, सीईटी, जेईईचे मार्गदर्शन : चाचणी परीक्षेसाठी ५ जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कारंजा तालुक्यातील सिंधीविहिरी येथील शासकीय आश्रमशाळा येथील मार्गदर्शन केंद्रात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी १२ जुलै रोजी चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचणी परीक्षेत सहभागी होण्यासाठी ५ जुलै पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील तसेच खाजगी मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी जे मार्च २०२६ च्या इयत्ता १० वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत व इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशाकरीता पात्र आहेत व नीट व जेईई अभ्यासक्रमाची प्रवेशपुर्व परीक्षेची तयारी करण्यास इच्छुक आहेत, असे विद्यार्थी, पालक व संबंधित शाळेचे मुख्याद्यापक यांनी सदर चाचणी परीक्षेसाठी अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून प्राप्त करुन ५ जुलै पर्यंत सादर करावे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos